प्रत्येक व्यक्ती मध्ये काही गूण असतात आणि दोषही असतात. ज्या व्यक्तीचे गूण तुम्हाला आवडतात किंवा ज्या व्यक्तीचे तुम्हाला अनुकरण करावंसं वाटतं तो व्यक्ती गुरु म्हणून सम्बोधला जात।
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी तरी गुरु स्थानी असतो. तो गुरु काळानुसार बदलत पण जातो. म्हणायचे तर, तुम्ही जेव्हा लहान असता तेव्हा तुम्हाला तुमचे आई -वडील गुरु वाटतात कारण ते तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवतात/सांगतात. तुम्हाला घडवतात. सगळ्यांनाच प्रथमतः आई - वडील हे गुरु स्थानी असतात. नक्कीच ते कायम गुरुस्थानी राहतात पण त्यांच्या व्यतिरिक्त अजूनही तुमचे गुरु असू शकतात.
माझ्या आयुष्यात पण असे अनेक गुरु चांगलं शिकवून गेले. माझे आई -वाडील हे कायमच माझ्या गुरुस्थानी राहतील पण त्यांच्या व्यतिरिक्त अजून एक व्यक्ती जी माझ्या आयुष्यात थोडी उशिरा आली पण गुरु बनून गेली.
ती व्यक्ती माझा एक खास मित्रच किंबहुना मित्राहूनही अधिक असं नातं असलेली व्यक्ती आहे. त्याचा बद्दल कितीही सांगावा ते कमीच आहे..त्या व्यक्तीला इतक्या गोष्टी करताना मी बघितल्या आहे की मलाच कधी कधी विचार येतो की इतका कसा काय कोणी करू शकता..घरचं काम असो, शाखेचा काम अस. कोणाला मदत करणं असो किंवा अजून बरेच काही जसे की गाणे,गणपती कार्यशाळा, तबला वादन,बासरी वादन,खेळ, देवपूजा, पौरोहित्य (ही त्यांच्या असंख्य आवडींपैकी काही निवडक आवडी मी नमूद केल्या आहेत)..सगळ्या गोष्टी इतक्या सकारात्मक, हसतमुखपणे करणं तेही न चिडता हे खूप कठीण आहे सामान्य माणसाला ..एकाही गोष्टीचा कंटाळा नाही..तेवढ्याच उत्साहाने प्रत्येक कार्य करणं आणि कोणत्याही कार्याचा अभिमान न बाळगणं..प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देऊन ते पूर्ण करणं..कोणत्याही कौतुकाची अपेक्षा पण न करणं...सतत हसतमुख चेहरा …सहनशीलपणा..…ऑफिसचा काम चालू असतातच त्यात पण ही बाकीची काम..कोणतेही कार्य करताना “मी थकलो ” हे शब्द नाहीत..कसं काय ..
स्वभावाने अत्यंत शांत,मनाने निर्मळ..आवाज एकदम मृदू..कोणालाही उलट बोलताना मी त्यांना बघितलं नाही..
सामान्यतः आपल्याला कालांतराने एकतरी दुर्गुण दिसतो.. पण ह्या व्यक्तीत दुर्गुण शोधून पण सापडणार नाही…अश्या व्यक्तीचा मला सहवास लाभला यातच मी स्वतःला भाग्यवान समजतो.
त्यांच्या कडून इतका काही शिकण्या सारखा आहे..थोडा जरी त्यातल प्रत्येकाला जमलं तरी खूप मोठी गोष्ट आहे.
अश्या पुरुषोत्तमाला माझा कोटी कोटी प्रणाम!!!!
Comentarios